Old 7/12 Utara: पहा १८८० पासूनचे जमिनीचे जुने ७/१२ उतारा

Old 7/12 Utara: तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण याठिकाणी Old 7/12 Utara उतारे काश्याप्रकारे अगदी घरबसल्या मोबाईलवर पाहू शकतो या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. जसे कि तुम्हाला माहिती आहे कि जमिनीचे कसल्याही प्रकारचे कागदपत्रे लागत असल्यास आपल्याला तहशील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जावे लागत होते.

तसेच अशा जमिनीसंबंधित कामामध्ये खूप वेळ लागत होता कारण जमिनीसंबंधित सर्व कामे हि कागदपत्राद्वारे होतात व ती कागदपत्रे स्वतः तेथील कर्मचाऱ्यांना हाताने शोधून आणावी लागत होती त्यामुळे अशा कामांना खूप वेळ लागतो व मोठ्या प्रमाणात समान्य लोकांची खूप फसवणूक देखील होते व भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणात होत होता.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महराष्ट्र सरकारने आता जमिनीविषयी च्या सर्व गोष्टी या ऑनलाईन स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. व बऱ्याचश्या गोष्टी आता ऑनलाईन स्वरूपात आपल्याला अगदी सहजरीत्या आता पाहता येत आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने Old 7/12 Utara हे देखील ऑनलाईन स्वरूपात आणले आहेत पण बऱ्याच लोकांना याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे या सेवेचा उपभोग त्यांना घेता येत नाही त्यामुळे आज आपण या लेखामध्ये Old 7/12 Utara या बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण पहा.

Old 7/12 Utara पहा जमिनीचे जुने ७/१२ उतारा

  • तर यासाठी महाराष्ट्र सरकारने यासाठी https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या पोर्टल चे निर्माण केलेले आहे. तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn हा दिलेला वेब अड्रेस कॉपी करून तुमच्या मोबाईल मध्ये सर्च करा. त्यानंतर तुमच्यासमोर अनेक सर्च रिझल्ट येतील त्यामध्ये तुम्हाला पहिल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पोर्टल ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला लॉगीन करायचे आहे,
  • जर तुम्ही यावर आधीच लॉगीन किंवा अकाऊन्ट बनवलेले नसेल तर नवीन युझर म्हणून रजिस्टर करून घ्यावे new user ragistretion वर क्लिक करून नवीन अकाऊन्ट बनवून घ्या new user ragistretion वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल.
  • वरती दाखवल्या प्रमाणे एक फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल दिलेला फॉर्म व्यवस्थित भरून दिल्यानंतर तुम्हाला एक युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल तो युझर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण तोच युझर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला पुन्हा लॉगीन करताना टाकायचा आहे.
  • तर संपूर्ण रजिस्टर झाल्यानंतर युझर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करून घ्यायचे आहे.
  • युझर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन केल्यानंतर तुमच्यासमोर वरती दाखवल्या प्रमाणे एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला तुमचा विभाग निवडण्यासाठी येईल त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल कि कोणते कागदपत्रे तुम्हाला पहायचे आहेत.ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर जितके पण रिझल्ट उपलब्ध असतील ते सर्व या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील.
  • वरती फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे तुमच्या समोर रिझल्ट येतील त्यामध्ये तुम्हाला Add To Cart या बटन वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला my cart वर क्लिक करायचे आहे व तेथे तुम्हाला तुम्ही Add केलेले सर्व कागदपत्रे पाहायला मिळतील.
  • वरती फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्हाला सर्व तुम्ही add cart केलेले कागदपत्रे पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला याठिकाणी दाखवले जाईल कि ते कागदपत्र सध्या उपलब्ध आहेत कि नाही जर उपलब्ध असेल तर तुम्हाला ते पाहायला मिळेल या नंतर तुम्ही ते कागदपत्र तुमच्या मोबाईल मध्ये देखील डाऊनलोड करून घेऊ शकता.

महत्वाची सूचना-: सध्या या पोर्टल वर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आलेले नाहीत यावर फक्त अकोला, अमरावती, धुळे, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, ठाणे याच जिल्ह्यांचे कागदपत्र मिळतील धन्यवाद.

तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्हाला आशा आहे कि आम्ही दिलेली Old 7/12 Utara बद्दल ची माहिती तुम्हाला आवडली असेल व त्यामुळे तुमचा खूप फायदा देखील झाला असेल तर आम्ही अशीच महत्वाची माहिती तुमच्यासाठी मराठीमध्ये घेऊन येत आहोत आमच्या या प्रयत्नांना तुमची अशीच साथ राहो धन्यवाद.

Leave a comment