
Modi Aavas Yojana: तर नमस्कार मित्रांनो आज आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत Modi Aavas Yojana संबंधित संपूर्ण माहिती कि हि योजना कोणासाठी आहे कोण नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत किंवा या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे व या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे तर हि सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण पहा.
तर ज्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना घरकुल देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजने नंतर आता मोदी आवास योजना सुरु केली आहे. आणि या मोदी आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल देण्यात येणार आहे. तर मित्रांनो कोणत्या लोकांना घरकुल मिळणार आहे तसेच घरकुल बांधकामासाठी किती अनुदान मिळेल आणि मोडी आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणती आठ कागदपत्र लागतील या संदर्भात शासनाने महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तेंव्हा या GR विषयी निर्गमित माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
Modi Aavas Yojana शासन निर्णय
राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबविण्यास शासन मान्यता देत आहे.
- आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी
- आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमेटिक प्रणाली द्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी
- जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी
हे देखील मोदी आवास योजनेसाठी पात्र असतील.
Modi Aavas Yojana योजनेचे स्वरूप
उपरोक्त १,२ व ३ मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरामध्ये रुपांतर करण्यासाठी रु. १.२० लक्ष अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे. या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किमान २६९ चौ. फुट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक राहील.
- योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड वरील १,२ व ३ मधून उपलब्ध झालेल्या कुटुंबांच्या यादीमधून निवड करण्यात येईल.
- सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्राधान्य क्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
- या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी या पूर्वी झाली नसेल अश्या लाभार्थ्यांची स्थळ पाहणी करण्यात येईल.
- ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्थरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत करण्यात येईल त्यानंतर मान्यतेसाठी जिल्हास्थारावर पाठविण्यात येईल.
Modi Aavas Yojana साठी लाभार्थी पात्रता
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
- लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असावे
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थ्याचे स्वतःचे अथवा कुटुंबाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
- लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधण्यात येईल.
- लाभार्थी कुटुंबाने महारष्ट्र राज्यातील कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार नाही.
- लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत च्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.
Modi Aavas Yojana साठी आवश्यक कागदपत्रे
७/१२ उतारा |
मालमत्ता नोंदपत्र |
ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र |
सक्षम प्रधीकार्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत |
आधार कार्ड ची प्रत |
मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुक ची छायांकित प्रत |
वीज बिल |
निवडणूक ओळखपत्र |
रेशनकार्ड |
Modi Aavas Yojana साठी ऑनलाईन आवेदन असे करा
- सर्वात प्रथम तुम्हाला pm aawas yojana च्या आधिकारिक वेबसाईट वर जावे लागेल हि लिंक कॉपी करा https://pmaymis.gov.in/ हा फॉर्म आपल्या जवळच्या जनसेवा केंद्रातून भरू शकता