Apli Chawadi 2023: पहा आपल्या गावाचे फेरफार मोबाईलवर

Apli Chawadi 2023: तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कि तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर तुमच्या गावाचे संपूर्ण चालू असलेले फेरफार Apli Chawadi द्वारे कश्या प्रकारे ऑनलाईन पाहू शकता तर यासाठी काय करावे लागेल याबद्दलची माहिती आम्ही या ठिकाणी सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत पहा.

तर मित्रांनो जसे कि आज या डिजिटल जगामध्ये संपूर्ण गोष्टी या ऑनलाईन आलेल्या आहेत तर महारष्ट्र सरकारने जमिनीविषयीचे बरेचसे काम हे ऑनलाईन आणले आहे. जसे कि पूर्वी आपल्यला जमिनीच्या संबंधित कोणतेही किरकोळ काम जरी असले तरीही तहशील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जावे लागत होते. आणि आपण जसे कि जाणता कि जमिनीच्या कामांमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांना खूप वेळ लागत होता कारण जमिनी विषयीच्या सर्वच गोष्टी कागदी होत्या व त्या कर्मचाऱ्यांना स्वतः जाऊन हाताने सापडून आणाव्या लागत होत्या.

यामुळे बराचसा वेळ वाया जात होता व अशा कामामध्ये शेतकऱ्याला खूप त्रास सहन करावा लागत होता कारण यामध्ये भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणावर होत होता.तर या सर्व गोष्टी सुरळीत चालण्यासाठी या गोष्टी ऑनलाईन आणणे खूप आवश्यक होते. यामुळे महारष्ट्र सरकारने जमिनी संबंधित सर्व गोष्टी ऑनलाईन आणण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी Mahabhulekh Apli Chawadi या पोर्टल चे निर्माण करण्यात आले.

तर Apli Chawadi या पोर्टल वर महारष्ट्र शासनाने तालुक्य नुसार त्यातील प्रत्येक गावाच्या फेरफार च्या नोंदी या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात ठेवलेल्या आहेत तर हि माहिती अगदी कोणीही कधी हि आपल्या मोबाईलवर पाहू शकता तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण पहा धन्यवाद.

Apli Chawadi ऑनलाईन फेरफार कसा पाहावा?

तर Apli Chawadi मध्ये तुम्हाला ऑनलाईन फेरफार पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये google क्रोम ओपन करायचा आहे. त्यामध्ये Mahabhulekh हे सर्च करायचे आहे. हे केल्यानंतर तुमच्या समोर google चे रिझल्ट येतील त्यामध्ये खाली फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे पहिल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

या लिंक वर केल्यानंतर तुमच्या समोर Mahabhulekh ची प्रमुख वेबसाईट ओपन होईल ती खाली दाखवल्या प्रमाणे दिसत असेल याची खात्री करा

तर अशा प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Apli Chawadi यावर क्लिक करायचे आहे वरती फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे व शेवटी त्यामध्ये तुमचे गाव निवडायचे आहे हे निवडून झाल्यानंतर खाली दिलेला captcha व्यवस्थित भरायचा आहे व त्यानंतर Apli Chawadi पहा यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल खाली फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे.

यामध्ये तुम्हाला फेरफार नंबर , फेरफार चा प्रकार त्याशिवाय फेरफार चा दिनांक गट नंबर या सर्व गोष्टी पाहायला मिळतील संपूर्ण फेरफार पाहण्यासाठी पहा या लिंक वर क्लिक करायचे आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण फेरफार तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल.

तर अशा प्रकारे तुमच्या समोर फेरफार अगदी मोबाईलमध्ये तुमच्या समोर ओपन होईल. तर मित्रांनो आशा आहे कि आम्ही दिलेली Apli Chawadi बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुमचा खूप फायदा देखील झला असेल तर आम्ही अशीच महत्वाची व फायदेशीर माहिती मराठीमध्ये घेऊन येत आहोत तर आमच्या या प्रयत्नांना तुमची अशीच साथ राहो धन्यवाद.

Apli Chawadi FAQ

1.     महारष्ट्र ऑनलाईन फेरफार कसा पाहावा?

तर मित्रांनो तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात जर तुम्हाला महाराष्ट्र ऑनलाईन फेरफार पहायचे असतील तर mahabhulekh या पोर्टल वर या सर्व सुविधा आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख पहा.

Leave a comment